रासायनिक खतांच्या दरात वाढ, प्रतिबॅग सहाशे ते सातशे रुपयांची वाढ, भाववाढीचा शेतकऱ्यांना फटका
Continues below advertisement
आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू असतानाच रासायनिक खतांच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभा टाकलंय.खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भ मध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेणारे शेतकरी आहेत सोयाबीन पिकासाठी आवश्यक असलेल्या डीएपी खताच्या भावात तर 50 टक्के भाव वाढ झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement