Love You Zindagi : लव्ह यू जिंदगीवर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू, 'त्या' तरुणीची कोरोनाशी झुंज अपयशी
कोरोना महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं आहे. यातही काही मृत्यू असे आहेत जे जवळचे नसूनही मनाला चटका लावून गेलेत. अशीच एक घटना समोर आली आहे. 'लव्ह यू झिंदगी' व्हायरल व्हिडिओतील मुलीचा जगण्यासाठीचा संघर्ष अखेर संपला आहे. कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आयसीयूत (ICU) 'लव्ह यू झिंदगी' या गाण्याचा आनंद घेतनाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिच्या मृत्यूची बातमी तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉ. मोनिका लंगे यांनी ट्विट करत दिली आहे. या बातमीनंतर नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्याविषयी सोशल मीडियावर लिहलं आहे.