Anil Deshmukh : मनी लॉण्ड्रींग प्रकरणात अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार, सचिन वाझेंचं ED ला पत्र
मनी लॉण्ड्रींग प्रकरणात मला जी माहिती आहे ती देण्यास मी तयार आहे. असं पत्र सचिन वाझे यांनी ईडीला दिलंय. मी माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. असंही या पत्रात म्हंटलंय. यामुळे मनी लाँड्रींग प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेंनी तयारी दाखवली असून या अर्जासंदर्भात ईडी 14 फेब्रुवारीला कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे.