Mumbai : बेस्ट बसचा प्रवास आता तिकीट लेस होणार, 'चलो ॲप'मुळे मोबाईलवर तिकीट दिसणार
बेस्ट बसचा प्रवास आता तिकीट लेस होणार आहे. 'चलो ॲप'मुळे मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. बेस्ट बसेसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, आता चलो अँपवरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकिट दिसणार आहे. 'चलो ॲप' उपलब्ध झाल्यापासून दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी या नवीन प्रणालीला पसंती दिली आहे. 14 फेब्रुवारीपासून ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे.