Income Taxला 1हजार 50कोटींचे संशयास्पद व्यवहार;महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी,व्यावसायिक,दलालांचा सहभाग
Continues below advertisement
आयकर विभागानं २३ सप्टेंबरपासून एक सर्च ऑपरेशन राबवलं. त्यात महाराष्ट्रातील काही व्यावसायिक, दलाल आणि महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याची माहिती आहे. आयकर विभागानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती समोर आलीय.. सुमारे ६ महिने प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या धाडी टाकण्यात आल्या आहेत...यात ४ कार्यालयांचा सुद्धा समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. यात हॉटेल ओबेरॉयमध्ये कायमस्वरुपी बुक करण्यात आलेल्या काही आलिशान खोल्यांचाही समावेश आहे..२ दलाल याठिकाणी सातत्यानं काहीजणांना भेटत होते..यात अनेक कोड वापरुन नोंदी केल्याचंही आयकर विभागाला आढळून आलंय...आयकर विभागाला आत्तापर्यंत १ हजार ५० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत....
Continues below advertisement