Yashwant Jadhav यांच्या घरी Income Tax ची कारवाई, तीन दिवसांच्या तपासात काय आढळलं?

Continues below advertisement

शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याची कारवाई तीन दिवस उलटून गेले तरी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी जाधव यांच्या घरी आयकर खात्याच्या पथकानं छापा टाकला. त्यानंतर आज चौथ्या दिवशीही आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम तिथंच आहे. मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगावातील घरी ही कारवाई सुरू आहे. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरीही आयकर विभागानं छापा टाकला. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवरही आयकर खात्यानं छापा टाकून कारवाई केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram