Maharashtra News : नवबौध्द मुलामुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन : ABP Majha
Continues below advertisement
संविधान दिनाचे औचित्य साधून चेंबूरमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलामुलींसाठी शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडला... या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थिती लावली... या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना निमंत्रण न दिल्यानं चेंबूरमधील रिपाईच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला...चेंबूर हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असून नावबौद्ध मुलामुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण इमारतीच्या उदघाटनाला आठवलेंना निमंत्रित न केल्य़ानं कार्यकर्त्यांनी तीव्र नाराज व्यक्त केली
Continues below advertisement