Marathwada Rains : गेल्या 4 दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे 12 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
नांदेड : जिल्ह्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी, शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला येणाऱ्या सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. इसापूर धरण 90 टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Continues below advertisement