Sadabhau Khot | लुटारुंची साथ सोडली तर शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेणार : सदाभाऊ खोत
Continues below advertisement
राजकारणात कोणच कोणाचा शत्रू नसतो असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. "राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणून फक्त त्यांच्यात आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास रस्त्यावर उतरले तर निश्चितपणाने राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन," असं सदाभाऊ खोत म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत सदाभाऊ खोत बोलत होते.
Continues below advertisement