NIA Raids : महाराष्ट्रात एटीएसच्या मदतीनं 13 जण ताब्यात, ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे

Continues below advertisement

  आयसीसशी (ISIS)  संबंधांच्या आरोपांवरून एनआयएने (NIA)  ठाणे (Thane News)  जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे.  एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर  14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे.  साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram