Vanchit Aaghadi : चिंचवडमध्ये वंचित राहुल कलाटेंच्या पाठीशी राहणार?

Continues below advertisement

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली असतानाच, आता चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यातच चिंचवडमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र या बैठकीनंतरही वंचित राहुल कलाटेंना पाठिंबा देण्यावर ठाम असल्याचं बोललं जातंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप पाठिंबा मागितलेला नसल्यामुळे, वंचित आज निर्णय जाहीर करण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, २०१९ साली वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता आणि प्रकाश आंबेडकरांनी तेव्हा तीन सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे, या खेपेला वंचित बहुजन आघाडी राहुल कलाटेंना पाठिंबा देऊ शकते, अशा चर्चा रंगल्यायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram