Imtiyaz Jaleel यांच्याकडून संभाजी भिडे यांची तुलना अजमल कसाबशी

औरंगाबाद : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी संभाजी भिडे यांची तुलना 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्यासोबत केली आहे. "अजमल कसाबने देशाला बंदुकीच्या जोरावर कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तर हे घाणेरडे लोक आपल्या जिभेचा वापर करुन देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. या घाणेरड्या लोकांना फारसं महत्व द्यायची गरज नाही," असं इम्तियाज जलील म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola