Monsoon : अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम, आवक घटल्यानं दरात 50 टक्क्यांनी घसरण
Continues below advertisement
राज्यात पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाल्यावर याचा परिणाम झाल्याने एपीएमसी मध्ये होणारी आवक घटली आहे. नाशिक , नगर, पुणे , सांगली, सातारा भागातून एपीएमसी मध्ये भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र काल पडलेल्या पावसामुळे भाजीपाला काढण्यास शेतकर्यांना अडचण झाल्याने मुंबईत होणारी आवक घटली आहे. 550 ते 600 गाड्यांची आवक आज 350 चे 400 गाड्या झाली आहे. एकीकडे भाजीपाला कमी आला असला तरी दुसरीकडे खरेदी करायला उठाव नसल्याने भाजी एपीएमसी मध्ये शिल्लक राहिली आहे. यामुळे दर 20 ते 30 टक्क्यांनी उतरले आहेत. सद्या पुढील तीन दिवस पावूस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिल्याने राज्यातील भाजीपाल्याचे नुकसान होवून पुढील आठवड्यात दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Monsoon Untimely Monsoon Maharashtra Maharashtra Monsoon Vegetables Vegetables Rate Hike