Jwala Dhote: बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको- ज्वाला धोटे
बलात्कार करायचा असेल तर वारांगनांवर करा, पण नागपुरातील सुसंस्कृत घरातील महिलांवर बलात्कार करू नका, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केलंय. नागपुरातील वारांगानांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. पोलीस आयुक्तांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली. त्याचा निषेध करण्यासाठी या महिलांनी मानवी साखळी केली. या महिलांचं नेतृत्व करताना ज्वाला धोटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.