ST Strike : पैसे देऊनही संप सुरू राहत असेल तर पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करणार : अनिल परब
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतरही, पैसे दिल्यानंतरही संप जर चालू राहणार असेल तर त्याचा काही अर्थ नाही. त्यामुळे राज्य सरकार बेशिस्त कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. महत्वाच्या मागण्या पूर्ण केल्याने आता कामगारांनी संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईभ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.