ICC World Cup : महिला एकदिवसीय वर्ल्डकप 2022 साठी भारतीय संघ जाहीर, संघाचं नेतृत्व मिताली राजकडे

Continues below advertisement

आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. एकदिवसीय वर्ल्डकप संघाचं नेतृत्व मिताली राजकडे असणार आहे. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष,  स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव या खेळाडूंचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना हा सहा मार्चला पाकिस्तानसोबत होणार आहे.
वर्ल्डकपपूर्वी भारत 9 ते 24 फेब्रुवारीपर्यंत न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. यात पाच एकदिवसीय आणि एक टी 20 सामन्याचा समावेश असेल. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. यंदाचा महिला एकदिवसीय वर्ल्डकप हा न्यूझीलंडमध्ये होणार आहे. दरम्यान या वर्ल्डकपनंतर मिताली राज निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram