Balasaheb Thorat : माझं वर्षभराचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार : बाळासाहेब थोरात

Continues below advertisement

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. तर काँग्रेसचे 53 आमदार त्यांचा महिन्याभराचा पगार देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. कोरोना संकट आणि राज्यात घेण्यात आलेल्या सरसकट मोफत लसीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सरसकट मोफत लसीकरणासाठी काँग्रेस आग्रही होती. अशातच लसीकरणादरम्यानचा राज्यावरचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी काँग्रेसच्या वतीनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram