Sharad Pawar PC : कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर, 1-2 दिवसांत निर्णय घेणार;शरद पवारांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे... खुद्द शरद पवार यांनीच अध्यक्षपदाबाबत आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिलीय... २ मे रोजी लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला... तेव्हापासून नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत... आणि तीन दिवसांपासून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्ते ठाण मांडून आहे... प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी समजूत काढूनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हेत... अखेर दुपारी ३ वाजता खुद्द या कथेच्या नायकानेच कार्यकर्त्यांशी संवाद साधाला आणि कार्यकर्ते शांत झाले... दोन दिवसांनंतर तुम्हाला आंदोलनाची वेळ येणार नाही, असं सांगतानाच पक्षाच्या भवितव्यासाठी
हा निर्णय घेतल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं