Aaditya Thackery On MNS : स्टंटबाजीला मी भाव देत नाही, आदीत्य ठाकरे यांचं मनसेला प्रत्युत्तर
मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं आज शिवसेनेला डिवचलं. त्यामुळे या मुद्यावर शिवसेना आणि मनसे असा सामना सुरु झाला. मनसेनं आज शिवसेनाभवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिका ऐकवली. रामनवमीचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केली. त्यानंतर पोलिसांनी भोंगा जप्त केला आणि मनसैनिकांना ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेला खोचक प्रत्युत्तर दिलंय. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.