Balasaheb Thorat on Resignation | मी अजून अध्यक्ष आहे, अद्याप राजीनामा दिलेला नाही : बाळासाहेब थोरात
Continues below advertisement
पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली आहे.
Continues below advertisement