Bhopal Taj Mahal : पत्नीसाठी उभारलं ताजमहल सारखं घरघर, नक्षीकामासाठी इंदौरमधल्या कलाकारांची मदत
मध्य प्रदेशातील आनंद प्रकाश नावाच्या व्यक्तीने पत्नीसाठी ताज महालची हुबेहूब प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे. हे घर बांधण्यासाठी आनंद यांना तीन वर्ष लागली. हे घर बांधणाऱ्या इंजिनिअरने सांगितलं की, "ताज महालची प्रतिकृती असलेलं हे घर बांधण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. खऱ्या ताज महालच्या बांधणीचा मी जवळून अभ्यास केला" त्यांनी नक्षीकाम करण्यासाठी बंगाल आणि इंदोरमधल्या कलाकारांची मदत घेतली. या घरात राजस्थान 'मकराना' ची लादी वापरण्यात आली आहे. या घरात १ बेडरुम, किचन, आणि मेडिटेशन रुम आहे.