Chandrapur Tiger Terror: नऊ दिवसांत चार शेतकऱ्यांचा बळी, मानव-वन्यजीव संघर्षाने जिल्हा हादरला.
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून, गेल्या नऊ दिवसांत वाघांच्या हल्ल्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, 'चंद्रपूरमधील वाघ इतर जिल्ह्यांत स्थलांतरित करणे आवश्यक आहे', अशी थेट मागणी माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या ३५० पेक्षा जास्त वाघ असून, अनेक वाघ मानवी वस्तीजवळ आढळून येत आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्रात वसलेल्या गावांचे कायद्यानुसार स्थलांतरण करणे शक्य नसल्याने, ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या कमी आहे, तेथे या वाघांना पाठवावे, असे त्यांनी सुचवले आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संताप असून, प्रशासनावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दबाव वाढत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement