Pune Land Deal: 'जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकवा', Dhangekar यांची 230 कोटी गोठवण्याची मागणी
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) संस्थेच्या जागेच्या व्यवहारावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आक्रमक झाले आहेत. 'जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकविण्यासाठी ही रक्कम गोठवा', अशी थेट मागणी धंगेकर यांनी केली आहे. धंगेकर यांनी 'X' वर ट्वीट करून, बिल्डरकडून ट्रस्टला मिळालेली २३० कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यावी अशी मागणी केली. तसेच, या व्यवहाराला जबाबदार असलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमावा, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हा संपूर्ण व्यवहार वादग्रस्त असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement