HSC Students | बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, जमिनीवर बसून परीक्षा देण्याची वेळ | ABP Majha

Continues below advertisement

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्य़ाच दिवशी इंग्रजीच्या पेपरला शिक्षण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बीड तालुक्यातील रायमोहा येथे अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर फरशी नसलेल्या जागेवर बसून परीक्षा द्यावी लागली.

बारावीसाठीच्या अतुल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर इतर भौतिक सुविधा देखील नाही आहेत. या परीक्षाकेंद्रावर काही विद्यार्थ्यांना चक्क जिल्हा परिषद शाळेतील डेस्क बसण्यासाठी देण्यात आले होते. या प्रकारानंतर शिक्षणविभागाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होतं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram