HSC Exam Timetable: दहावी बारावीचं सविस्तर वेळापत्रक जाहीर, यंदा अर्धा तास ज्यादा ABP Majha

दहावी आणि बारावीचं सर्विस्तर वेळापत्रक जाहीर झालंय. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धातासाचा अधिक वेळ देण्यात आलाय. ऑनलाईन अभ्यासक्रमामुळं विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाल्यानं परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ असणार आहे. त्यामुळे ८०,९० आणि १०० टक्के मार्कच्या ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षांना आर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ५०,६०आणि ७० टक्के मार्कच्या ज्या परीक्षा होणार आहे त्यासाठी १५ मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख २६ हजार ९८० विद्यार्थी तर दहावीसाठी १५ लाख २७ हजार ७६२ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola