Hrushikesh Bedre Special Report : अटकेनंतर ऋषीकेश बेदरेचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, प्रकरण काय?
२३ ऑगस्ट २०२३ रोजी जालन्याच्या अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला... आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पसरला... कोण म्हणतं पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केला, तर कुणी म्हणतं, आंदोलकांनी दगडफेक केली... अशा या आरोपांच्या गर्तेत हे आंदोलन सापडलंय... त्यातच, आता एका तरुणाला अटक झालीय... ज्याच्याकडे पिस्तुल सापडलंय... आणि आता तर एक फोटोही व्हायरल करण्यात येतोय... ज्यात शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं जातंय... पाहूयात, नेमकं काय घडलंय... या रिपोर्टमधून...