Hrushikesh Bedre : लूटमार, दरोडा ते दंगल अंतरवाली दगडफेकीतला आरोपी ऋषिकेश बेदरेवर गंभीर गुन्हे!
Continues below advertisement
अंतरवाली सराटीतल्या दगडफेकीतला प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेवर याआधीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय. बेदरेला अटक झाल्यावर त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तुल जप्त केलंय. २००९ पासून बेदरेवर १४ ते १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, लूटमार, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करून कट रचणे, अॅट्रोसिटी, दारू विक्री असे गुन्हे दाखल आहेत. कोर्टाने बेदरेला दगडफेक प्रकरणात २ साथीदारांसह अटक झालीय. २ डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
Continues below advertisement