Corona मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना कशी मिळणार 50 हजारांची मदत? असा कराल अर्ज
राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ही मदत मिळवण्यासाठी http://mahacovid19relief.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.