Nanded : 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सौमय मुंडेंचा देशभर डंका; सोमयचं परिवार ABP माझावर...

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आणि एका डॉक्टर दांपत्याचा मुलगा असलेल्या IPS अधिकारी सोमय मुंडे यांनी शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत, धाडसी कार्यवाही करत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 जणांना कंठस्नान घातलं. 

एवढी मोठी धाडसी कार्यवाही करून देशाची व राज्याची मान उंचावणारे सोमय विनायक मुंडे  हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवाशी आहेत. वय फक्त 31 वर्षे असणारे सोमय विनायक मुंडे  यांना बालपणापासूनच आयपीएस अधिकारी व्हायचं होतं. IPS अधिकारी असणाऱ्या सोमय मुंडे यांचे  शिक्षण एमटेक, आयआयटी आहे. सोमय यांचे प्राथमिक शिक्षण हे देगलूर  येथील साधना हायस्कुल या ठिकाणी झालं आहे. तर माध्यमिक शिक्षण-सातारा सैनिकी शाळा आणि राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज, देहराडून या ठिकाणी झालं आहे. सोमय यांनी आयआयटी व एमटेक ही पदवी मुंबईहून घेतली. सोमय हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन IPS अधिकारी आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola