कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरं देणार :गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या एका निर्णयाला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित दिली होती. जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या 100 सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर आज कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना बॉम्बे डाईंगमध्ये घरे मिळणार असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच परवानगी शिवाय मी कोणतंच काम करत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.