Hivrebajar School : 100 दिवस शाळेचे, हिवरे बाजारनं करुन दाखवलं ABP Majha
अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार येथे शाळा सुरू होऊन आज 100 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे हिवरेबाजार मध्ये "100 दिवस शाळेचे" हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय बंद करून ऑनलाइन शिक्षण सुविधा उपलब्ध केली. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक संसाधने नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने हिवरेबाजार गावांमध्ये 15 जून रोजी शाळा सुरू करण्यात आली. आज शाळेला शंभर दिवस पूर्ण झाल्याने हिवरेबाजार मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे हिवरे बाजार येथे निर्विघ्न शाळा सुरू झाली त्याचप्रमाणे सबंध राज्यात देखील शाळा सुरु राहाव्यात अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पोपट पवार यांनी व्यक्त केली.