Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA
Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA
बहुजन विकास आघाडीचे डहाणू चे उमेदवार सुरेश पाडवी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला यावर प्रतिक्रिया देताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली की, भाजपाचे राजकारण कसे चालते ते आज आपण बघितलं आहे, पैशाच्या जोरावर उमेदवारच फोडत आहे, आपण या संपूर्ण घटनेची माहिती घेतो हितेंद्र ठाकूरांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी
शरद पवारांच्या सभेनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द केली. पवारांच्या सभेनंतरची पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करत तूर्तास यावर काही न बोलण्याची भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवार आंबेगावच्या सभेत काय म्हणाले?
ते म्हणतात साहेब माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत, आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले.