Hingoli Farmers | वन्य प्राण्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल

 हरणांचे कळप, निल गाईंचे कळप, रानडुकर, वानर, कोल्हे, यासह इतरही वन्यप्राण्यांच्या हैदोसाने सध्या हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी त्रस्त झालेत. औंढा नागनाथ तालुक्यातील आसोंदा गावातल्या गजानन शिंदे आणि किशनराव शिंदे या दोन्ही शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांना घाबरवण्यासाठी आपल्या शेतात चक्क वाघाचे बॅनर लावलेत.. या बॅनरमागून ऑडिओ साऊंड सिस्टीम आणि टेप रेकॉर्डरद्वारे वाघाच्या डरकाळ्या ही शेताच्या बांधावर ऐकू येत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola