Hingoli Crime : हिंगोलीत दृश्यम पाहून तिहेरी खून, हिंगोलीतील 'तो' अपघात नसून घातपातच ABP Majha

Continues below advertisement

Hingoli Crime : हिंगोलीत दृश्यम पाहून तिहेरी खून, हिंगोलीतील 'तो' अपघात नसून घातपातच ABP Majha
बुलेटिनच्या सुरूवातीला एक धक्कादायक बातमी हिंगोलीतून... दिग्रसच्या वाणी गावाजवळ ११ जानेवारी रोजी दुचाकीचा अपघात झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता तो अपघात नसून घातपात असल्याचं उघड झालंय. आई-वडिलांसह सख्ख्या भावाची हत्या केल्याप्रकरणी महेंद्र जाधव याला अटक करण्यात आलीय. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी महेंद्र जाधवने दृश्यम सिनेमा आणि क्राईम पेट्रोलचे काही एपिसोड बघून ही हत्या केल्याचं चौकशीत समोर आलंय. आई वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत आणि नातेवाईकांकडे पैसे मागतो अशी बदनामी केल्याच्या रागातून हत्या केल्याची 
कबुली महेंद्र जाधवने दिलीय. आधी भाऊ आकाश जाधव त्यानंतर आई कलावती जाधव आणि शेवटी वडील कुंडलिक जाधव यांना ठार मारून रस्त्याच्या कडेला अपघाताचा बनाव करत मृतदेह रस्त्याशेजारी ठेवल्याचं समोर आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram