Hindi Language Issue : हिंदी भाषा शिकवलीच जाणार, राज्य सरकारचं हिंदीप्रेम वाढलं! ABP MAJHA

Continues below advertisement

Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: महाराष्ट्रात (Maharashtra News) आता हिंदी भाषेवरून (Hindi Sakti) नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे, इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (National Education Policy) अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) टप्प्याटप्प्यानं बदल लागू करण्यात येणार आहेत. त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी आणि इंग्रजीसोबत (English Language) हिंदी सक्तीच्या (Hindi Language) निर्णयाचा. त्यावरून राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) संघर्षाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हिंदीसक्तीची दिशा कशी असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हिंदी सक्तीला होणाऱ्या वाढत्या विरोधानंतर हिंदी शिकवण्यासाठी 'अनिवार्य' शब्द मागे घेण्यात आला असून आता हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20 हून अधिक विद्यार्थी हवेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

हिंदी भाषा शिकवण्यासाठी करण्यात आलेल्या सक्तीवर मराठी चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमेने म्हणाला की, "हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा… हिंदी ही तृतीय भाषा असेल… ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?" 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola