Himachal Pradesh Red Alert : 36 तासात 14 ठिकाणी दरडी कोसळल्या, 700 रस्ते बंद ABP Majha

Continues below advertisement

Himachal Pradesh Red Alert : 36 तासात 14 ठिकाणी दरडी कोसळल्या, 700 रस्ते बंद ABP Majha

हिमाचल प्रदेशसह उत्तरेच्या अनेक राज्यांमध्ये पूर आला आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. कुल्लू, मंडी, मणिकरन साहीब आणि चंबा भागांमध्ये अनेक नद्यांनी रौद्र रुप धारण केलं आहे. हिमाचलमध्ये गेल्या ३६ तासांत दरडी कोसळण्याच्या १४ मोठय़ा घटना आणि १३ ठिकाणी आकस्मिक पुराची नोंद झाली. तर सातशेहून अधिक रस्ते बंद करण्यात आले असल्याची माहिती हिमाचल प्रदेशच्या आपत्कालीन कक्षाने दिली. सिमला येथे घर कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर कुलू आणि मनालीमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला. शेजारील उत्तराखंडमध्ये, ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गुलारनजीक भूस्खलन झाल्यामुळे भाविकांना घेऊन जाणारी एक जीप नदीत कोसळली, यामध्ये तीन भाविक वाहून गेले. दरम्यान, जम्मू व काश्मीरच्या उंचावरील भागांमध्ये, तसेच लडाखमध्ये हिमवर्षांव झाल्याचे वृत्त असून, या भागात पावसाचा रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram