ABP News

Dr. Vijay Joshi :ऑस्ट्रेलिया खड्डेमुक्त करणारे ठाणेकर,महामार्ग निर्मिती तज्ज्ञ डॉ.विजय जोशी 'माझा'वर

Continues below advertisement

Dr. Vijay Joshi : महाराष्ट्रात खड्ड्यांचं जाळं... खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि मणक्याचे आजार... यामुळे जनता त्रस्त आहे... गेले कित्येक वर्ष सर्वसामान्य जनता खड्ड्यांविरोधात सरकारच्या नावानं शखं फुकतेय.... बोंब ठोकतेय पण अद्याप त्यावर उपाय काही सापडेना.... पण संपूर्ण महाराष्ट्रालाच काय देशाच्या वाहतूक व्यवस्थेला खड्ड्यात घालणाऱ्या या खड्ड्यांवर उपाय देणारी एक व्यक्ती आपल्याच ठाण्यातली आहे.. . त्यांचं नाव आहे महामार्ग निर्मिती तज्ज्ञ डॉ. विजय जोशी..... मूळचे ठाणे पूर्वेतील रहिवाशी असणारे डॉक्टर विजय जोशी यांच्याकडे खड्ड्यांवरील समस्येवर जगमान्य उपाय आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लुटॉन होगॅन कंपनीने अनेक रस्ते बांधले आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने 2012 साली त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असणारा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार देऊन गौरविले आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram