Uddhav Thackeray : ठाकरेंच्या संपत्ती प्रकरणी सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार, काय घडलं कोर्टात?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. काही कारणास्तव मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठानं याचिकार्त्यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.