Shegaon High Alert : Delhi बॉम्बस्फोटानंतर Shegaon च्या Gajanan Maharaj मंदिरात सुरक्षा वाढवली
Continues below advertisement
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने मंदिरात शीघ्र कृती दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, देशभरातून येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून चौकशी केली जात आहे. दिल्लीतील घटनेमुळे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांना हा विशेष अलर्ट देण्यात आल्याने, शेगावातही बुलढाणा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement