High Alert: Ayodhya सह Shirdi, Shegaon, Kolhapur मंदिरे आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली
Continues below advertisement
देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अयोध्या येथील श्रीराम मंदिर, तसेच महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर आणि कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर या प्रमुख धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. यासोबतच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे मेट्रो स्टेशन, नाशिक आणि जळगाव रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरही सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. संपूर्ण प्रशासनाकडून प्रवास करणाऱ्या किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement