Maharashtra Monsoon : राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाचा कहर; रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं
Continues below advertisement
पुण्यातील धानोरी, लोहगाव, कळस या भागात जोरदार पाऊस झालाय. या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं . ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचा मोठा प्रवाह वाहायला लागला. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरलं. पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या.
Continues below advertisement