Hemant Soren Resigns : हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, अटक होण्याची शक्यता?
Continues below advertisement
Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement