Hemant Godse:उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार,महायुतीतल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या
Continues below advertisement
Hemant Godse:उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार,महायुतीतल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या
नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करतायेत. प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत असं गोडसे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. तुम्ही विद्यमान खासदार आहेत, तुम्ही प्रचार सुरू करा, असं शिंदे म्हणाल्याचं गोडसे सांगतायेत. त्यांच्या प्रचारामुळे मात्र महायुतीतल्या अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण म्हणजे गोडसे यांना अजून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली नाहीये. उलट नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवार मिळणार अशी जोरदार चर्चा आहे. तरीही गोडसे यांनी प्रचार सुरू केला आहे.
Continues below advertisement