Local Body Election : स्थानिक निवडणुका BJP स्वबळावर लढणार, Heena Gavit यांची Nandurbar मध्ये घोषणा

Continues below advertisement
नंदुरबारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप नेत्या हीना गावित यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवर गंभीर आरोप केले आहेत. 'लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेनेने काँग्रेसचं काम केलं,' असा थेट आरोप गावित यांनी केला आहे. या आरोपामुळे भाजप आणि शिंदे सेनेमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. आगामी काळात अक्कलकुवा आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणाही हीना गावित यांनी केली आहे. नंदुरबार विधानसभेत शिवसेनेसोबत युती होणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांच्या वडिलांनी, विजयकुमार गावित यांनी, यापूर्वीच दिले होते, याकडेही या निमित्ताने लक्ष वेधले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola