JNU Elections 2025: डाव्या संघटना vs ABVP थेट लढत, Jawaharlal Nehru विद्यापीठात मतदानाला सुरुवात
Continues below advertisement
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्य लढत डाव्या संघटना (Left Unity) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही निवडणूक पारंपारिक बॅलेट पेपरच्या सहाय्याने घेतली जात आहे. संपूर्ण दिल्लीचे आणि देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे JNU चा गड कोण राखणार, डाव्या संघटना आपलं वर्चस्व कायम ठेवणार की ABVP मुसंडी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement