Sindhudurg Rain : तळकोकणात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर ; बांदा बाजारपेठेत पुराचं पाणी घुसल

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पूूूर आला. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. बांदा शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले मार्गे बेळगाव मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीच्या बाहेर वाहत असल्याने बांदा परिसरातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram