Rain in Konkan : मुसळधार पावसाने कोकणाला झोडपलं; सिंधुदुर्गातल्या निर्मला नदीला पूर
मागील 3 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे कोकणातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीतल्या अनेक नद्यांना पूर आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निर्मला नदीला पूर आल्यानं 27 गावांचा संपर्क तुटलाय. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. आजही सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीए. दरम्यान, राज्यभरात 1 ते 12 जुलैदरम्यान 360 मिमी पावसाची नोंद झालीय.