Maharashtra Monsoon : कोकण , गोवा , विदर्भ आणि मराठवाड्यात कमी वेळात जास्त पावसाचा इशारा
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
Tags :
Maharashtra Monsoon Maharashtra Rain Konkan Flood Monsoon Konkan Rain Maharashtra Rains Update Monsoon 2021 Chiplun Rain Mahad Flood Chiplun Flood Update Maharashtra Rain Flood Situation In Konkan Mahad Rain Update Raigad Weather Forecast