Summer Heat Wave : फेब्रुवारीत उकाड्याचा 147 वर्षांतील उच्चांक, पुढील तीन महिने उकाडा कायम राहणार
Continues below advertisement
Summer Heat Wave : फेब्रुवारीत उकाड्याचा 147 वर्षांतील उच्चांक, पुढील तीन महिने उकाडा कायम राहणार
यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १४७ वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरलाय. पुढील तीन महिने उकाडा कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात उष्णतेच्या लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिलाय. ईशान्य भारतासह पूर्व आणि मध्य तसंच वायव्य भारतात मार्च ते मे या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमानाची शक्यता आहे.. सलग दुसऱ्या वर्षी धडकत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणाम गहू, तेलबिया, हरभरा यांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. तर विजेचा वापर वाढून वीजनिर्मितीवरही ताण येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement