Hearing On Maharashtra Karnataka Border: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

सांगलीतल्या जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकमधील भाजप सरकारने दावा केल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उग्र झालाय..दरम्य़ान या प्रकरणावरील प्रलंबित सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे.. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज दिल्लीत दाखल होणार आहेत. ते यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. तसंच ते केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचींही चर्चा करण्याची शक्यता आहे. सीमावादासंदर्भात कर्नाटकच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनींही सुनावणीसंदर्भात मंत्र्यांची बैठक घेतली. राज्य सरकारने मंत्री चंदक्रात पाटील आमि शंभूराज देसाई यांची समिती नेमली असून ते न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात समन्वय साधणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram